‘ऑपरेशन सिंदूर’वरील अमेरिकचा नवा अहवाल समोर
* भारताचे 3, पाकिस्तानचे 5 जेट पाडल्याचा दावा नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर (हिं.स.)।पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात यावर्षी 7 ते 10 मे दरम्यान झालेला चार दिवसांचा लष्करी संघर्ष जरी संपला असला, तरी त्या काळात झालेले नुकसा
‘ऑपरेशन सिंदूर’वरील अमेरिकन अहवाल समोर; भारताचे 3 तर पाकिस्तानचे 5 जेट पाडल्याचा दावा


* भारताचे 3, पाकिस्तानचे 5 जेट पाडल्याचा दावा

नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर (हिं.स.)।पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात यावर्षी 7 ते 10 मे दरम्यान झालेला चार दिवसांचा लष्करी संघर्ष जरी संपला असला, तरी त्या काळात झालेले नुकसान आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ याबाबतच्या चर्चा अद्याप सुरू आहेत. अमेरिकन काँग्रेसच्या नव्या अहवालाने हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आणला आहे असून अनेक मोठे दावे केले आहेत. अहवालानुसार, भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानने आपल्या 5 लष्करी विमानांना गमावले. भारताने देखील तीन जेट गमावले, मात्र अहवालानुसार ती सर्व राफेल नव्हती. ही माहिती अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या जुन्या दाव्यांशीही जुळते, ज्यात त्यांनी म्हटले होते की संघर्षात एकूण 8 जेट पाडले गेले होते. पाकिस्तानच्या काही माजी लष्करी अधिकाऱ्यांनीही माध्यमांमध्ये आपली विमानं हरवल्याचे मान्य केले होते.

ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला आहे की मेच्या सुरुवातीला झालेल्या या संघर्षात एकूण 8 विमाने खाली पाडली गेली. अमेरिकन अहवालाशी तुलना करता स्पष्ट होते की पाकिस्तानने एकट्यानेच 5 युद्धविमान गमावली, ज्यामुळे त्यांच्या विजयाच्या दाव्यांची पोल उघड होते आणि भारताचे दावे अधिक बळकट होतात.

अमेरिकन अहवालात असेही म्हटले आहे की संघर्षानंतर चीनने भारताच्या राफेल विमानांबाबत चुकीची माहिती पसरवली. असा आरोप आहे की चीन हे सर्व आपली जे-10 फायटर जेट्स आणि पीएल-15 क्षेपणास्त्रे विकण्यासाठी करत होते, ज्यांचा वापर भारताची विमाने पाडण्यासाठी करण्यात आला, असे सांगितले जात होते.

अहवालात मान्य केले आहे की भारताने तीन जेट्स गमावली, पण ही सर्व राफेल होतीच असे नाही. हे याआधीच्या अमेरिकन गुप्तचर मूल्यांकनाशीही जुळते, ज्यात पाकिस्तानच्या जे-10 विमानांनी भारताची दोन जेट पाडल्याचा अंदाज होता, ज्यामध्ये एक राफेलही सामील होते.

दरम्यान, ट्रम्प यांनी मियामीतील एका कार्यक्रमात दावा केला की भारत आणि पाकिस्तान यांना युद्धापासून परावृत्त करण्यामध्ये त्यांची भूमिका होती. त्यांनी सांगितले की एकूण 7 जेट खाली पाडली गेली होती, तर आठवे गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाले होते. ट्रम्प यांच्या मते, त्यांनी टॅरिफ लावण्याची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानला संघर्ष थांबवण्यास भाग पाडले. त्यांनी हा दावा अनेक वेळा केला आहे. मात्र भारताने ट्रम्प यांच्या दाव्यांचे वारंवार खंडन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande