दुबई एअर शोदरम्यान तेजस विमान कोसळले
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : दुबई एअर शोमध्ये डेमोदरम्यान भारतीय तेजस लढाऊ विमान आज, शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाचे प्रात्याक्षिक सुरू असताना दुपारी सुमारे 2:10 वाजता ही घटना घडली. अपघातानंतर काळा धूर आकाशात पसरला आणि परिसरात गोंधळ
दुबईत अपघातग्रस्त झालेल्या तेजस विमानाचे छायाचित्र


नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : दुबई एअर शोमध्ये डेमोदरम्यान भारतीय तेजस लढाऊ विमान आज, शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाचे प्रात्याक्षिक सुरू असताना दुपारी सुमारे 2:10 वाजता ही घटना घडली. अपघातानंतर काळा धूर आकाशात पसरला आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला. अपघातापूर्वी वैमानिक विमानातून बाहेर पडला की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

दुबई एअर शोतील शुक्रवारी आयोजित केलेल्या उड्डाण प्रात्यक्षिकादरम्यान भारतीय तेजस लढाऊ विमानाचा अचानक ताबा सुटला आणि ते खाली कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 वाजता घडलेल्या या घटनेत विमान जमिनीवर आदळताच जोरदार स्फोटाचा आवाज झाला आणि काही क्षणांत काजळीच्या धुराचे मोठे ढग हवेत पसरले. अपघातानंतर पायलटची स्थिती स्पष्ट नाही आणि त्यांनी वेळेत इजेक्ट केले होते की नाही, हेही अजून निश्चित झालेले नाही. घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande