दुबई : तेजस विमान अपघातात पायलटचा मृत्यू
भारतीय वायुदलाकडून वैमानिकाच्या मृत्यूला दुजोरा नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : दुबई एअर शोदरम्यान भारतीय तेजस एमके-1 लढाऊ विमान शुक्रवारी प्रात्यक्षिक उड्डाण करताना कोसळले. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.10 वाजता नियंत्रण सुटल्याने विमान जमिनीवर
दुबईत अपघातग्रस्त झालेल्या तेजस विमानाचे छायाचित्र


भारतीय वायुदलाकडून वैमानिकाच्या मृत्यूला दुजोरा

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर (हिं.स.) : दुबई एअर शोदरम्यान भारतीय तेजस एमके-1 लढाऊ विमान शुक्रवारी प्रात्यक्षिक उड्डाण करताना कोसळले. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.10 वाजता नियंत्रण सुटल्याने विमान जमिनीवर आदळले व मोठा स्फोट झाला. या अपघातात पायलटचा मृत्यू झाल्याचे भारतीय वायुदलाने सांगितले.

या दुर्घटनेनंतर तत्काळ सुरक्षादल, हेलिकॉप्टर व अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली. आगीवर कमी वेळात नियंत्रण मिळवण्यात आले. एअर शो परिसर सील करण्यात आला असून सर्व फ्लाइंग डिस्प्ले तात्पुरते थांबवले आहेत. कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दुर्घटनेनंतर काही क्षणांतच हेलिकॉप्टर व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग लवकरच आटोक्यात आणली. सुमारे 45 मिनिटांत संपूर्ण परिस्थिती नियंत्रित करण्यात आली. कार्यक्रम पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबत अजून स्पष्ट माहिती नाही. एअर शो अधिकाऱ्यांनी दुर्घटना झालेला परिसर तत्काळ सील केला आणि सर्व फ्लाइंग कार्यक्रम तात्पुरते थांबवले आहेत.

दुबई वर्ल्ड सेंट्रल येथे 17–21 नोव्हेंबरदरम्यान आयोजित केलेल्या एअर शोमध्ये 200 हून अधिक विमानांचे प्रदर्शन केले जात आहे. तेजस हे एचएएलने विकसित केलेले 4.5 जनरेशनचे स्वदेशी लढाऊ विमान असून त्याच्या वेग, चपळता व आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande