रत्नागिरी : डेरवणच्या ट्रायथलॉनमध्ये आरोही, अर्सिन, शुभ्राचे वर्चस्व
रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) | भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघातर्फे आयोजित केलेल्या अस्मिता लिग मैदानी स्पर्धेत ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आरोही शिर्के, अर्सिन खातिन आणि शुभ्रा सरफरे यांनी विज
रत्नागिरी : डेरवणच्या ट्रायथलॉनमध्ये आरोही, अर्सिन, शुभ्राचे वर्चस्व


रत्नागिरी, 25 नोव्हेंबर, (हिं. स.) | भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स महासंघातर्फे आयोजित केलेल्या अस्मिता लिग मैदानी स्पर्धेत ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आरोही शिर्के, अर्सिन खातिन आणि शुभ्रा सरफरे यांनी विजेतेपद पटकावले, तर १६ वर्षांखालील मुलींच्या गटात ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत श्रेया मर्कडने प्रथम क्रमांक पटकावला.

रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे ही स्पर्धा डेरवण येथील क्रीडासंकुलात आयोजित केली होती. १४ व १६ वर्षांखालील मुलींच्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन खेलो इंडियाचे प्रशिक्षक कृष्णांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, प्रशिक्षक अविनाश पवार, अजहर खलपे, प्रशांत कवळे आदी उपस्थित होते.

भारतातील ३०० जिल्ह्यांमधून ही अस्मिता लीग ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हा स्पर्धेतून गुणवत्ताधारक खेळाडूंची निवड करणे हा प्रमुख उद्देश आहे. गुणवत्ता शोध अस्मिता ॲथलेटिक्स स्पर्धेतून रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींना एक माध्यम तयार होईल, असे संदीप तावडे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देताना, आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी स्पर्धेदरम्यान नोंदवली. प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा -

१४ वर्षांखालील मुली (अनुक्रमे प्रथम ३ क्रमांक): ट्रायथलॉन ए : आरोही शिर्के (संगमेश्वर), गायत्री पोतदार (रत्नागिरी), संस्कृती जानकर (खेड). ट्रायथलॉन बी:अर्सिन खातिन संगमेश्वर), श्रेया नालापल्ले राजापूर), दानिया जुवले (संगमेश्वर). ट्रायथलॉन सी :- शुभ्रा सरफरे (रत्नागिरी), सौम्या सरफरे(रत्नागिरी), इच्छा भिंगे (चिपळूण). १६ वर्षांखालील मुली ६० मीटर धावणे : श्रेया मर्कड (लांजा), झोयाफातिमा शाह (संगमेश्वर), नजीफा बागलकोट (संगमेश्वर). ६०० मीटर धावणे : हुमेरा सय्यद (चिपळूण), स्वाती आखाडे (खेड), सोनाली डिंगणकर (गुहागर). लांब उडी: वेदिका जगदाळे (संगमेश्वर), इच्छा भिंगे (चिपळूण), सिद्धी गावडे (रत्नागिरी). उंच उडी : सान्वी चव्हाण (लांजा). गोळाफेक : झोया मजगावकर (संगमेश्वर), नशारा सोलकर (रत्नागिरी), झरीन पावसकर (रत्नागिरी). थाळीफेक : संजना रावत (खेड). भालाफेक : मदिहा बोरकर (रत्नागिरी), उमेकुलसुम सोलकर (रत्नागिरी).

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande