जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ ची पदकांच्या कमाईसह चमकदार कामगिरी
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नवी दिल्ली येथे 14 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) ने उत्कृष्ट कामगिरी केली असून देशातील उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षणाचे एक आघाडीचे केंद
Army Sports Institute


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। नवी दिल्ली येथे 14 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) ने उत्कृष्ट कामगिरी केली असून देशातील उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षणाचे एक आघाडीचे केंद्र म्हणून असलेला आपला नावलौकिक पुन्हा अधोरेखित केला.

स्पर्धेत सहभागी झालेल्या एएसआयच्या सर्वच्या सर्व नऊ मुष्टियोद्ध्यांनी पदके जिंकली- 100% मुष्टियोद्ध्यांनी पदके प्राप्त करणे ही असामान्य गोष्ट असून ती भारतीय लष्कर आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे. या चमूने कौशल्य, दृढनिश्चय आणि जागतिक दर्जाची तयारी दाखवत 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

सुवर्ण पदक विजेते:

हवालदार अरुंधती (70 किलो)

नायब सुभेदार जैस्मीन (57 किलो)

हवालदार सचिन (60 किलो)

या खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीबरोबरच रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांनीही शिस्त, लढाऊ वृत्ती आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल असामान्य वचनबद्धता दाखवत तितक्याच उत्साहाने प्रयत्न केले.

आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटने मिळवलेली पदके ही आधुनिक प्रशिक्षण परिसंस्था, खेळाडूंचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन तसेच त्यांचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि सैनिकांनी समर्पितपणे केलेल्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे. भारतीय लष्कराच्या वतीने सर्व पदक विजेत्यांचे त्यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल अभिनंदन तसेच जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावणारे जागतिक दर्जाचे खेळाडूंना घडविण्यासाठी कायमची वचनबद्धता व्यक्त करण्यात येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande