
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी गुरुवारी क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. लिलावात विक्रमी २७७ क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. पण केवळ ७३ जागा उपलब्ध आहेत. हा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. या वर्षी, लिलावात दीप्ती शर्मा, क्रांती गौड आणि श्री चरणी सारख्या महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर धनाचा वर्षाव होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या हंगामाच्या तुलनेत लिलावात सहभागी होणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. ज्यामुळे महिला प्रीमियर लीगची जलद लोकप्रियता आणि जगभरातील महिला क्रिकेटपटूंमध्ये त्याचे आकर्षण स्पष्टपणे दिसून येते. यावेळी, लिलावाच्या यादीत १९४ भारतीय क्रिकेटपटू्ंचा समावेश आहे, ज्यामध्ये ५२ कॅप्ड क्रिकेटपटू आणि १४२ अनकॅप्ड क्रिकेटपटूंचा समावेश आहे. कॅप्ड क्रिकेटपटू म्हणजे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले क्रिकेटपूट आणि अनकॅप्ड क्रिकेटपटू म्हणजे ज्यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. त्या संघांना उपलब्ध असलेल्या ५० भारतीय स्लॉटसाठी स्पर्धा करतील. परदेशी क्रिकेटपटूंच्या विभागात काही सर्वोत्तम क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. एकूण ८३ परदेशी क्रिकेटपटूंची यादी आहे, ज्यामध्ये ६६ कॅप्ड आणि १७ अनकॅप्ड क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यांच्यासाठी २३ जागा उपलब्ध आहेत.
एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंना मोठी मागणी असेल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू दीप्ती शर्माला जोरदार बोली लागण्याची शक्यता आहे. विश्वचषक अंतिम सामन्यानंतर उत्तर प्रदेश वॉरियर्सने तिला सोडले. क्रांती आणि चरणी सारखे तरुण क्रिकेटपटू पैशाच्या बाबतीत दीप्तीच्या बोलीशी जुळले तर आश्चर्य वाटणार नाही. दोघेही विश्वचषकातील त्यांच्या प्रभावी कामगिरीने प्रभावित झाले. हरलीन देओल, रेणुका सिंग आणि स्नेह राणा देखील लिलावाचा भाग आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेकटपटूंमध्ये माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग, सध्याची ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीली, इंग्लंडची आघाडीची फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोन, न्यूझीलंडची सोफी डेव्हिन, तिची सहकारी अमेलिया केर आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड यांचा समावेश आहे. फक्त एका क्रिकेटपटूला कायम ठेवल्यानंतर, यूपी वॉरियर्सकडे लिलावात सर्वाधिक पर्स (१४.५ कोटी रुपये) आहे, तर दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात कमी पर्स (५.७० कोटी रुपये) आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे