बार्शीतील तब्बल सात खासगी सावकारांविरोधात गुन्हा
सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। कौटुंबिक खर्चासाठी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याने वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. जमेल तसे फेडत असतानाही आठ महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला, धमक्या दिल्या. या प्रकरणी तब्ब
बार्शीतील तब्बल सात खासगी सावकारांविरोधात गुन्हा


सोलापूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। कौटुंबिक खर्चासाठी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याने वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. जमेल तसे फेडत असतानाही आठ महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला, धमक्या दिल्या. या प्रकरणी तब्बल सात खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.नीलेश खुडे (रा. सुभाषनगर, लहुजी चौक), प्रशांत माने (रा. बालाजी कॉलनी), विशाल गुगळे (रा. बार्शी), अतुल कांबळे (रा. मंगळवार पेठ), संगीता विजय पवार (रा. गाडेगाव रोड), सचिन सोनवणे (रा. भीमनगर), संतोष नानासाहेब कळमकर अशी गुन्हा दाखल सावकारांची नावे आहेत. गणेश गोविंद बनसोडे (४५, रा. म्हाडा कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पत्नी वैशाली बनसोडे यांनी फिर्याद दाखल केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande