केअरटेकर आणि शिपाई यांची मतिमंद विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स. : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात काही केअरटेकर आणि शिपाई यांनी मतिमंद विद्यार्थ्यांना बेदम मारह
केअरटेकर आणि शिपाई यांची मतिमंद विद्यार्थ्यांना बेदम मारहाण


छत्रपती संभाजीनगर, 3 नोव्हेंबर (हिं.स.

:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात काही केअरटेकर आणि शिपाई यांनी मतिमंद विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

कुकरच्या झाकणांनी, लाथा-बुक्क्यांनी या लेकरांना मारहाण केल्याचा प्रकार प्रकाशात आला असून, या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दृश्य स्पष्ट दिसत आहे.

या अमानवी वागणुकीत दोन पैकी एक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्याने एका विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल आहे.

या संस्थेत काळजीवाहक म्हणून काम करणाराने. विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितले की, या दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. संस्थेतील इतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाचीही चौकशी केली जात आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande