बीड:बसमध्ये महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास
बीड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। बीड ते मांजरसुंबा बस प्रवासात महिलेच्या बॅगमधून तब्बल ४ लाख ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने लंपास केल्याची घटना बीड- मांजरसुंबा प्रवासा दरम्यान घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान
बीड:बसमध्ये महिलेचे साडेचार लाखांचे दागिने लंपास


बीड, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।

बीड ते मांजरसुंबा

बस प्रवासात महिलेच्या बॅगमधून तब्बल ४ लाख ४९ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने लंपास केल्याची घटना बीड- मांजरसुंबा प्रवासा दरम्यान घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, दिवाळीनंतर महिला प्रवाशांची संख्या वाढल्याने बसस्थानक आणि प्रवासा दरम्यान होणाऱ्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

तक्रार विशाखा स्वप्निल मगर (२५, रा. थेरगाव, पुणे) यांनी याबाबत दिली. त्यांच्या तक्रारीनुसार त्या राज्य परिवहन महामंडळाच्या सेमी स्लिपर बसने बीड ते मांजरसुंबा दरम्यान प्रवास करत मांजरसुंबा बसस्थानकात त्यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी महिलेने विशाखा यांच्या बॅगमधून सोने असलेली बॅग लंपास केली. त्यांच्या बॅगमधून सोन्याच्या बांगड्या, ५१ हजार ५०० रुपयांच्या १ तोळ्याच्या लहान मुलीच्या सोन्याच्या बांगड्या, ५९ हजार ५०० रुपयांची १ तोळ्याची सोनसाखळी, ५२ हजार ६२४ रुपयांचे १ तोळ्यांचे कानातील झुबे, ३ हजार ३०० रुपयांचा सोन्याचा बदाम, ५ हजार ९०५ रुपयांच्या सोन्याच्या मनगटी, ५ हजार ९०५ रुपयांची १ ग्रॅमची सोन्याची नथ, १ हजार ३०० रुपयांचे चांदीचे वाळे, ६६ हजार ९५० रुपयांचे १३ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, २९ हजार ७५० रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५ हजार ९०५ रुपयांचे सोन्याचे कारले, ९ हजार ६२७ रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप्स, १ हजार ५० रुपयांचे चांदीचे जोडवे असा एकूण ४ लाख ४९ हजार ३१६ रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

या प्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्रान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande