
लातूर, 3 नोव्हेंबर (हिं.स.)।
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय, साठवणूक व वाहतूक करीत असलेल्या एक इसमा विरोधात कारवाई करीत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू वाहनासह ८ लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय,साठवणूक व वाहतूक करणा-यावर प्रतिबंधित गुटखासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात १ लाख ३३५ रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली ७ लाख रुपयाची मारुती सुझुकी कंपनीची सियाज कार असा एकूण ८ लाख ३३५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री, वाहतूक, साठवणूक करताना राधेश्याम शत्रुघन जाजू, वय ४७ वर्ष, रा. मिलेनियम अपार्टमेंट, रामनगर, जुना औसा रोड, लातूर, याचे विरुद्ध पोलीस विवेकानंद चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार मनोज खोसे, चंद्रकांत डांगे,अर्जुन रजपूत, विनोद चलवाड, राजेश कंचे, यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis