गडचिरोली-आलापल्ली येथे प्रतिबंधीत तंबाखू आणि कारसह दोन आरोपींना अटक!
गडचिरोली., 3 नोव्हेंबर (हिं.स.) अहेरी पोलिसांनी प्रतिबंधीत सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आलापल्ली येथे, दिनांक 03/11/2025 रोजी मध्यरात्री, पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातून 3,16,400/- किमतीची ''मजा 108
जप्त मुद्देमाल प्रतिबंधित सुगंधित तंबाखू सह आरोपी


गडचिरोली., 3 नोव्हेंबर (हिं.स.) अहेरी पोलिसांनी प्रतिबंधीत सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आलापल्ली येथे, दिनांक 03/11/2025 रोजी मध्यरात्री, पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातून 3,16,400/- किमतीची 'मजा 108' बनावट तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरलेली ₹ 3,00,000/- किमतीची मारुती सेलेरियो कार, असा एकूण ₹ 6,16,400/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोनही आरोपीवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 123, 274, 276, 277, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन 280 नग सुगंधित तंबाखूचे डब्बे आणि एक मारुती सेलेरियो कार.या कारवाईत जप्त करण्यात आली आहे

अहेरी पोलीस ठाण्याचे पोना ज्ञानेश्वर निलावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 03/11/2025 रोजी पहाटे 02:00 ते 03:20 वा. दरम्यान, आरोपी शंकर मा-यालु भिमराजुलवार (वय 36, रा. आलापल्ली) आणि प्रितम राजेश पेटेवार (वय 30, रा. श्रमिक नगर, आलापल्ली) हे दोघे संगनमत करून महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे प्रतिबंधीत केलेली 'मजा 108' सुगंधित तंबाखू अवैधरीत्या वाहतूक करून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे, पोलिसांनी घटनास्थळ - आलापूर भामरागड रोडवर अंदाजे 07 कि.मी. पूर्व येथे सापळा रचुन

पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता, त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या चुंगळीमध्ये सुगंधीत तंबाखूचे एकूण 280 डब्बे आढळून आले. या मालाची किंमत ₹ 3,16,400/- इतकी आहे. तसेच, त्यांच्या ताब्यात असलेली मारुती सेलेरियो कार (क्र. एम.एच 33 ए.4301) जप्त करण्यात आली.

या दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तपासी अधिकारी म्हणून मपोउपनि दिपाली कांबळे तपास करत आहेत, तर या कारवाई प्रभारी अधिकारी सपोनि मंगेश यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

या कारवाईमुळे या भागात पसरणाऱ्या अवैध तंबाखू विक्रीच्या साखळीवर मोठा प्रहार झाल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande