
दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.) - राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
भाजपा कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही मात्र मविआ आणि आता नवा भिडू राज ठाकरे हे जाती, धर्म, समाजांमध्ये भेदभाव करत असून त्यांना आम्ही उघडे पाडणार असा इशाराही ॲड. शेलार यांनी यावेळी दिला. यावेळी ॲड. शेलार यांनी 8 वर्गीकरणातील याद्यांमधील मतदारांची नावे सादर करीत मविआ आणि राज ठाकरे यांच्या असत्यकथनाचा पर्दाफाश केला. अनेक आमदारांच्या मतदारसंघांतील मुस्लीम दुबार मतदारांची संख्या आणि मविआ आमदारांचे मताधिक्य याची तुलना करीत अनेक मविआ आमदारांचा विजय या मुस्लीम दुबार मतदारांमुळेच झाला असे म्हणायचे का असे म्हणत त्यांनी राज ठाकरे, मविआला लक्ष्य केले. भाजपाची भूमिका ही नेहमीच ‘सर्वांना न्याय, पण कुणाचेही तुष्टीकरण नाही’ अशी आहे असेही त्यांनी नमूद केले. जे कोणी दुबार मतदार दिसतील त्यांना फोडून टाकण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का? असा सवालही त्यांनी केला.
ॲड. शेलार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चामध्ये निव्वळ असत्यकथन करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांना ‘जोर का झटका’ लागल्याने दिल्लीतील पप्पू ते गल्लीतील पप्पू पर्यंत सर्वांनी मतचोरीच्या फेक नरेटिव्हची बांधणी करत रान उठवण्यास सुरुवात केली. त्याचाच पुढचा अंक आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विरोधक खोट्या माहितीच्या आधारे रंगवण्य़ाचा प्रयत्न करत आहेत. मतचोरीचा खोटा गळा काढून मविआने केलेला खरा घोटाळा दाबला जात आहे.
मविआच्या गडबडीची उदाहरणे दाखवाच या मविआच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाही आणि कदापि देणार नाही मात्र उघड्या डोळ्यांनी दिसणारे वास्तव समोर मांडत आहोत असे श्री. शेलार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत मविआने सुनियोजित ‘व्होट जिहाद’ करत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली होती. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी खेळ केला होता अशीही टीकेची झोड ॲड. शेलार यांनी उठवली.
कर्जत - जामखेड, लातूर, माळशिरस, धारावी, मुंबादेवी आदी 31 मतदारसंघांत दुबार मुस्लीम मतदार
31 विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणानंतर 2 लाख 25 हजार 791 मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांची संख्या समोर आली असून सर्व 288 मदारसंघातील हाच आकडा 16 लाख 84 हजार 256 वर जाऊ शकेल असेही ते म्हणाले. ह्या आकड्यात मविआच्या समर्थकांचा समावेश नाही असेही त्यांनी नमूद केले. मविआ नेते ही नावे का घेत नाहीत असा परखड सवाल करत ॲड. शेलार यांनी त्या मतदारसंघांची यादीच सादर केली.
रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात: मुस्लिम दुबार मतदार 5532 (1243 मतांनी विजय) : नाना पटोलेंच्या साकोली विधानसभा मतदारसंघात :मुस्लीमांची दुबार मते 477 (208 मतांनी विजय), वरुण सरदेसांईंच्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात :13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार (11,365 मतांनी विजय ), बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर 5324 मतांनी विजयी झाले , तिथे 14,944 दुबार मुस्लिम मते आहेत.
जितेंद्र आव्हाडांच्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघात : दुबार मुस्लिम मते 30,601
उत्तम जानकरांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात : दुबार मुस्लिम मते
4399 राजेश टोपेंच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात: दुबार मुस्लिम मते 11,75. (केवळ 2309 मतांनी शिवसेना विजयी)
अमित देशमुखांच्या लातूर शहर मतदारसंघात : 20,613 दुबार मुस्लिम मते
ज्योती गायकवाडांच्या धारावी मध्ये : 10,689 दुबार मुस्लिम मते
अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मध्ये : 11,126 दुबार मुस्लिम मते
नितीन राऊतांच्या उत्तर नागपूर मध्ये : 8342 दुबार मुस्लिम मते
अस्लम शेख यांच्या मालाड पश्चिम मध्ये : 17,007 दुबार मुस्लिम मते (6227 मतांनी विजय) .
राहुल पाटील यांच्या परभणी मध्ये : 13,313 दुबार मुस्लिम मते
सुनील राऊतांच्या विक्रोळीत : 3450 दुबार मुस्लिम मते.
संजय पोतनीसांच्या कलिना मध्ये : 6973 दुबार मुस्लिम मते(5008 मतांनी विजय )
अनंत नर यांच्या जोगेश्वरी पूर्व मध्ये : 6441 दुबार मुस्लिम मते(1541 मतांनी विजय )
नितीन देशमुखांच्या बाळापूर मध्ये : 5251 दुबार मुस्लिम मते
सुनील प्रभूंच्या दिंडोशीत : 5347 दुबार मुस्लिम मते(6182 मतांनी विजय)
कैलास पाटील यांच्या धाराशिवमध्ये : 11,242 दुबार मुस्लिम मते
एकच फोटो वापरुन केवळ नावे बदलण्यात आली. असे मोठे घोटाळे महाविकास आघाडीने केले आहेत.
कर्जत-जामखेड
शबनम शेख : अनुक्रमांक 742 मध्ये आणि 743 मध्येही.
रूबिना शेख : अनुक्रमांक 1268 मध्ये आणि 1264 मध्येही
साजिद शेख : अनुक्रमांक 321 मध्ये आणि 323 मध्येही
आयशा आतार : अनु. 235 मध्ये आणि 236 मध्येही
रेयान रईस कुरेशी : अनु. 1285 मध्ये आणि 1312 मध्येही.
अफसाना पठाण : अनु. 360 आणि 1058 मध्येही.
बांद्रे पूर्व :
मुमताज बानो अन्सारी
दोन ठिकाणे नावे. अनुक्रमांक 1012 आणि 437
विधानसभा झाल्यावर हे नाव डिलिट झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी