शेफाली वर्माचा महिला क्रिकेट जगज्जेतेपदाचा स्वप्नवत प्रवास
नवी मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.)२०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना हा केवळ भारताच्या विजयाची कहाणी नव्हती, तर तो शफाली वर्मासाठी पुनर्जन्म होता असंचं म्हणावं लागणार आहे. सहा दिवसांपूर्वीपर्यंत तिला टीम इंडियाच्या विश्वचषक संघातही स्थान मिळा
शफाली वर्मा


नवी मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.)२०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना हा केवळ भारताच्या विजयाची कहाणी नव्हती, तर तो शफाली वर्मासाठी पुनर्जन्म होता असंचं म्हणावं लागणार आहे. सहा दिवसांपूर्वीपर्यंत तिला टीम इंडियाच्या विश्वचषक संघातही स्थान मिळाले नव्हते. पण नशिबाने तिला साथ दिली आणि प्रतिका रावल जखमी झाल्यानंतर तिला बोलावण्यात आले. आणि या संधीचे तिने इतिहासात रूपांतर केले.

२१ वर्षे आणि २७९ दिवसांत, शेफाली वर्मा विश्वचषक अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड झालेली सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली. ही तीच शफाली आहे. जिचं नाव भारतीय संघात चर्चेतही नव्हतं. पण तिने अखेरच्या सामन्या अष्टपैलू कामगिरी करत आपलं नाव नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात

सुवर्णाक्षरांनी कोरंल आहे.

शेफालीने जुलै २०२२ मध्ये शेवटचे एकदिवसीय अर्धशतक झळकावले होते. तेव्हापासून, तिने १३ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नव्हते. नऊ वेळा १५ पेक्षा कमी धावांवर ती बाद झाली आणि सहा वेळा एकेरी धावसंख्या गाठण्यात तिला यश आलं होतं. पण तिने कधीही हार मानली नाही. तिने हरियाणाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. २०२४-२५ च्या हंगामात ७५.२८ च्या सरासरीने आणि १५२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि २०२५ च्या WPL मध्ये चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटी होती.

जेव्हा नशिबाने तिच्यासाठी आपले दरवाजे उघडले तेव्हा शेफालीने जग जिंकले. उपांत्य फेरीत शानदार पुनरागमन केल्यानंतर, तिने अंतिम फेरीत अर्धशतक झळकावले. आणि जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या अँनेके बॉशने ५६ धावांवर तिचा झेल सोडला तेव्हा जणू नशिबानेच तिच्या हातात बॅट ठेवली होती. शेफालीने त्या संधीचा फायदा घेतला आणि ५२ वर्षांनंतर भारताला महिला विश्वचषक विजेता बनवले. तिने ७८ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. तिने मॅरिझाने कॅप आणि सून लुसच्या महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या.

सामन्यानंतर शेफालीने म्हणाली, मी सुरुवातीला म्हणाले होते की देवाने मला काहीतरी चांगले करण्यासाठी पाठवले आहे. आणि आज ते खरे ठरले. मी खूप आनंदी आहे की, आपण अखेर विश्वचषक जिंकलो. मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही.

ती पुढे म्हणाली, संघात उशिरा बोलावल्यानंतर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. पण मी स्वतःवर विश्वास ठेवला. माझे पालक, भाऊ आणि मित्र खूप पाठिंबा देत होते. त्यांनी मला नेहमीच शांत राहून माझ्या खेळावर विश्वास ठेवण्यास सांगितले. आज, त्याचे फळ मिळाले.

शेफालीने स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरचे आभार मानले, स्मृती दीदी सतत माझ्याशी बोलत होत्या आणि हरमन दीदी नेहमीच पाठिंबा देत होत्या. वरिष्ठांनी मला माझा खेळ खेळायला सांगितले आणि घाबरू नको. जेव्हा तुमच्यात इतका आत्मविश्वास असतो तेव्हा तुम्ही फक्त हसून मैदानावर खेळा.

शेफालीने सांगितले की, सचिन तेंडुलकर तिची प्रेरणा आहे. ती म्हणाली, सचिन सर बाल्कनीत होते; त्यांना पाहून मला एक वेगळाच उत्साह मिळाला. मी त्यांच्याशी बोलत राहते. ते नेहमीच मला आत्मविश्वास देतात. अंतिम फेरीत त्यांना पाहून मला असे वाटले की माझ्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande