भारतातील युजर्ससाठी आजपासून चॅटजीपीटीचा गो प्लॅन मोफत
मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। ओपनएआयनं भारतातील सर्व युजर्ससाठी चॅटजीपीटी गो प्लॅन आजपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला आहे. ही ऑफर एक वर्षासाठी लागू असून, आता भारतीय युजर्सना कोणतीही सबस्क्रिप्शन फी न देता प्रगत एआय फीचर्सचा लाभ घेता येणार आहे.
ChatGPT Go


मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। ओपनएआयनं भारतातील सर्व युजर्ससाठी चॅटजीपीटी गो प्लॅन आजपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला आहे. ही ऑफर एक वर्षासाठी लागू असून, आता भारतीय युजर्सना कोणतीही सबस्क्रिप्शन फी न देता प्रगत एआय फीचर्सचा लाभ घेता येणार आहे. पूर्वी हा प्लॅन दरमहा 399 रुपये किंवा सुमारे 5 अमेरिकन डॉलर इतक्या दरात उपलब्ध होता. भारत हा ओपनएआयसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजारपेठ मानला जातो आणि त्यामुळे एआयचा विस्तार करण्यासाठी कंपनीनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या योजनेमुळे शिक्षण, व्यवसाय, कोडिंग आणि सर्जनशील प्रकल्पांमध्ये चॅटजीपीटीचा वापर करणाऱ्या लाखो भारतीय युजर्सना मोठा फायदा होणार आहे.

ओपनएआयनं जाहीर केलं की, ही योजना भारत सरकारच्या ‘इंडिया एआय मिशन’शी सुसंगत आहे. कंपनी शिक्षण संस्था आणि नागरी संघटनांशी सहकार्य करत असून, ग्रामीण भागात एआयचा प्रसार करण्यावर भर देत आहे. चॅटजीपीटी गो प्लॅनमध्ये जीपीटी-5 मॉडेलचा वापर केला जातो, ज्यामुळे उत्तरं अधिक जलद, अचूक आणि स्मूथ मिळतात. या प्लॅनमध्ये फ्री व्हर्जनपेक्षा 10 पट जास्त मेसेज लिमिट, इमेज जनरेशन आणि फाइल अपलोडची सुविधा दिली आहे. तसेच, चॅटबॉटला 2 पट अधिक मेमरी मिळाल्याने तो आधीच्या संवादांची आठवण ठेवून वैयक्तिक उत्तरं देतो. लांब संभाषण, डॉक्युमेंट्सचे विश्लेषण, इमेज क्रिएशन आणि कंटेंट जनरेशनसाठी हा प्लॅन अधिक उपयुक्त ठरणार आहे.

ओपनएआयचे उपाध्यक्ष आणि चॅटजीपीटी प्रमुख निक टर्ली यांनी सांगितलं की, “भारतातील पहिल्या डेव्हडे एक्स्चेंज इव्हेंटच्या पूर्वी आम्ही चॅटजीपीटी गो एक वर्ष मोफत करत आहोत, ज्यामुळे अधिकाधिक लोकांना प्रगत एआयचा अनुभव घेता येईल आणि ते नवीन गोष्टी शिकतील, तयार करतील.”

कसा घ्याल लाभ?

ऑफरचा लाभ घेण्यासाठी चॅटजीपीटी वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवर लॉग इन किंवा साइन अप करा. लॉग इन केल्यानंतर पात्र युजर्सना चॅटजीपीटी गो मोफत सक्रिय करता येईल. ऑफर आता लाईव्ह आहे. ओपनएआयची ही योजना भारतातील एआय क्रांतीला बळ देईल. लाखो युजर्सना प्रगत टूल्स मोफत मिळाल्यानं नाविन्य आणि उत्पादकता वाढेल.

चॅटजीपीटी गो मोफत सक्रिय करण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो कारा...

1. चॅटजीपीटी वेबसाइट किंवा अ‍ॅप उघडा.

ब्राउजरमध्ये chatgpt.com (https://chatgpt.com) उघडा किंवा

मोबाइलवर ChatGPT अ‍ॅप (iOS/Android) डाउनलोड करा आणि उघडा.

2. लॉग इन किंवा साइन अप करा

ईमेल/गूगल/मायक्रोसॉफ्ट खात्याने लॉग इन करा.

नवीन युजर असल्यास Sign up करा (भारतीय फोन नंबर/ईमेल वापरा).

3. प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.

डाव्या खालील प्रोफाइल आयकॉन (किंवा ☰ मेनू) उघडा.

Upgrade to Go किंवा ChatGPT Go पर्याय दिसेल.

4. चॅटजीपीटी गो निवडा.

ChatGPT Go प्लॅनवर क्लिक करा.

“Free for 1 year (India)” असा मेसेज दिसेल.

5. मोफत सक्रिय करा.

Activate for Free किंवा Get Go Free बटण दाबा.

कोणतेही पेमेंट तपशील भरण्याची गरज नाही.

6. यशस्वी झाल्याची पुष्टी मिळवा

“ChatGPT Go activated for 1 year” असा मेसेज येईल.

आता 10x मेसेज लिमिट, इमेज जनरेशन, फाइल अपलोड सक्रिय होतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande