
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने (बीएसई: 532924, एनएसई: कोलतेपाटील) वर्सोवा येथे त्यांचा खास प्रोजेक्ट सेरेनोव्हाच्या लाँचिंगसह सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या हंगामात अधिकच उत्साह आणला. हा प्रोजेक्ट मुंबईच्या गजबजाटात रहिवाशांना शांतता आणि स्थिरतेचा अनुभव देईल.
या प्रकल्पात अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करत 2 आणि 3 बेडरूमची घरे बांधण्यात आली आहेत, ज्याची किंमत 3.2 कोटी रुपयांपासून सुरू होते. जागा, शांतता आणि सुसंस्कृतता यांना महत्त्व देणाऱ्यांसाठी प्रामुख्याने याची रचना करण्यात आली आहे. ही एक अशी शांत जागा आहे, जिथे मुंबईचा वेग थोडा मंदावतो.
शांततेचा हा विलक्षण अनुभव देण्यासाठी, सेरेनोव्हा येथील 69 खास घरांपैकी प्रत्येकाची रचना ही जागा, नैसर्गिक प्रकाश, खेळती हवा, निसर्गाची विपुलता आणि प्रत्येकाची खास स्पेस जपण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. हे विचारपूर्वक केलेले नियोजन या घरांना एक वेगळीच शांतता देते, जे रहिवाशांना आराम करण्यास प्रोत्साहित करतात. शिवाय, प्रत्येक घराना एक स्वतंत्र बाल्कनी, डिजिटल लॉक आणि मोशन सेन्सर लाइटिंग सारखी स्मार्ट होम फीचर्स आहेत. तसेच आधुनिकता आणि कार्यक्षमता संतुलित राहील, अशी त्याची उत्तम रचना आहे.
सेरेनोव्हा उभारण्यासाठी करण्यात आलेली जागेची निवड ही अत्यंत उत्तम आहे. कारण त्यात शांततेसह सोयीचा देखील विचार आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध होतात. यामध्ये वर्सोवा मेट्रो स्टेशन, अंधेरी रेल्वे स्टेशन आणि वर्सोवाला अन्य शहराशी जोडणारे अनेक मेट्रो कॉरिडॉरची सोय आहे. यात लाइन 1, लाइन 2बी (विकासाधीन), लाइन 7 (अंधेरी-पूर्व दहिसर पट्ट्यात कार्यरत), आणि पूर्णपणे कार्यरत अॅक्वा लाइन 3 (कुलाबा-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स-सीप्झ भूमिगत कॉरिडॉर) यांचा समावेश आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि बांधकामाधीन वर्सोवा-वांद्रे सी लिंकशी कनेक्टिव्हिटीचा देखील या प्रकल्पाला फायदा होतो. यामुळे वर्सोवा, वांद्रे आणि दक्षिण मुंबई दरम्यान उत्तर-दक्षिण किनारपट्टीवरून वाहतूक सुलभ होईल आणि शहरापर्यंत पोहोचण्यास अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे.
कनेक्टिव्हिटी शिवायही सेरेनोव्हा सामाजिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. जमनाबाई नरसी आणि बिल्लाबोंग हाय सारख्या आघाडीच्या शाळा, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी आणि नानावती मॅक्स सारखी प्रसिद्ध रुग्णालये तसेच इन्फिनिटी मॉल आणि सिटी मॉलसह शॉपिंग डेस्टिनेशन्स, या सगळ्या गोष्टी जवळच आहेत.
अंदाजे 0.8 एकर जागेवर पसरलेल्या या प्रकल्पात विविध प्रकारच्या अंतर्गत आणि बाह्य सुविधांचा समावेश आहे. यात सुंदर रचना केलेले मार्ग, डेक आणि लाउंज झोनसह स्विमिंग पूल, फिटनेस आणि वेलनेस स्पेसेस, वेगवेगळ्या खेळांसाठी बांधण्यात आलेले कोर्ट, इनडोअर गेम्स आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी खास जागांची रचना यांचा समावेश आहे. या प्रकल्पात मुले आणि ज्येष्ठांचा देखील विचार करण्यात आलेला आहे. ज्यामुळे स्वतःच्या सोयीचा विचार करतानाच सामाजिक भान देखील जपले जाते.
सेरेनोव्हाच्या माध्यमातून कोलते-पाटील आजच्या घरमालकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अनुभव देत आहेत. उत्तम डिझाइन, धोरणात्मक स्थान आणि वास्तविक जगातील कार्यक्षमता येथे एकत्र आली आहे. केवळ उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या परिसरात घर घेण्याशी हे संबंधित नाही, तर आरामदायी आणि दैनंदिन सहजतेवर आधारित जीवनशैली निवडण्याबद्दल आहे. मुंबईत आपला विस्तार करत असताना कोलते-पाटील या सेरेनोव्हाच्या माध्यमातून शहरी राहणीमानाकडे पाहण्याचा कंपनीचा दृष्टिकोन दर्शवतात - उत्कृष्ट नियोजन, सतर्क आणि ज्यांच्यासाठी घरे बांधली आहेत त्यांच्या गरजा पूर्ण होत आहेत की नाही, याचे भान असलेले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule