
जळगाव, 4 नोव्हेंबर (हिं.स.) मंगळवारी, ४ नोव्हेंबर रोजी सोन्यासह चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून येत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोने दरात ७१० रूपयांची घसरण झाली असून, एक तोळं सोनं खरेदीसाठी आता १,२२,४६० रूपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेट सोने दरात ६५० रूपयांची घसरण झाली असून, २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी १,१२,२५० रूपये मोजावे लागणार आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५४० रूपयांची घसरण झाली असून, १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आता ९,१८,४०० रूपये मोजावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर