विवोचा नवीन बजेट स्मार्टफोन विवो वाय १९एस ५जी लॉन्च
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। विवो कंपनीनं भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन विवो वाय १९एस ५जी लॉंच केला आहे. हा फोन 6000mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह आणि 5G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपयांप
Vivo Y19s 5G


मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। विवो कंपनीनं भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन विवो वाय १९एस ५जी लॉंच केला आहे. हा फोन 6000mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह आणि 5G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन दोन आकर्षक रंगांमध्ये — माजेस्टिक ग्रीन आणि टायटॅनियम सिल्व्हर— तसेच तीन स्टोरेज पर्यायांसह उपलब्ध होईल.

विवो वाय १९एस ५जी मध्ये 6.74 इंचांचा LCD डिस्प्ले देण्यात आला असून, याची रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. डिस्प्लेला 90Hz रिफ्रेश रेट, 70% NTSC कलर गॅमट, 260ppi पिक्सेल डेन्सिटी आणि 700 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट आहे. हा ड्युअल-सिम फोन Android 15 वर आधारित FuntouchOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये 6nm प्रोसेसवर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 2.4GHz पीक क्लॉक स्पीडपर्यंत कार्य करतो. फोनमध्ये 6GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 128GB पर्यंत eMMC5.1 स्टोरेज देण्यात आलं आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येऊ शकतं.

कॅमेर्‍याच्या बाबतीत, फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी (f/2.2) आणि 0.8 मेगापिक्सलचा सेकंडरी (f/3.0) सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात LED फ्लॅशसह नाइट, पोर्ट्रेट, लाइव्ह फोटो, स्लो-मो आणि टाइम-लॅप्स मोडसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो टीयर्ड्रॉप नॉचमध्ये बसविण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.4, USB Type-C, GPS, BeiDou, GLONASS, Galileo आणि QZSS सपोर्ट आहे. सुरक्षा आणि सेन्सर्ससाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, ॲक्सिलरोमीटर, अ‍ॅम्बियंट लाइट, प्रॉक्सिमिटी आणि ई-कॉम्पास देण्यात आले आहेत. फोनला IP64 रेटिंग मिळालं आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्याच्या स्प्लॅशपासून सुरक्षित राहतो.

हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह येतो, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं या बॅटरीसाठी 5 वर्षांच्या बॅटरी हेल्थची हमी दिली आहे. फोनचे डायमेंशन्स 167.3×76.95×8.19mm असून, वजन 199 ग्रॅम आहे.किंमतींच्या बाबतीत, 4GB RAM + 64GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये, 4GB + 128GB व्हेरिएंटची 11,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये असण्याची शक्यता आहे. विवोचा हा नवीन विवो वाय १९एस ५जी फोन बजेट सेगमेंटमध्ये मोठी बॅटरी, आकर्षक डिझाइन आणि 5G सपोर्टसह वापरकर्त्यांना उत्तम पर्याय ठरण्याची अपेक्षा आहे. कंपनी लवकरच याची अधिकृत किंमत आणि विक्रीची तारीख जाहीर करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande