बिहारमध्ये गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान
पटना, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या,गुरुवारी (6 नोव्हेंबर रोजी) मतदान होणार आहे. या टप्प्यात सुमारे 3 कोटी 75 लाख मतदार 1314 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत. या टप्प्यातील मुख्य सामना इंडी
संग्रहित लोगो


पटना, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या,गुरुवारी (6 नोव्हेंबर रोजी) मतदान होणार आहे. या टप्प्यात सुमारे 3 कोटी 75 लाख मतदार 1314 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत. या टप्प्यातील मुख्य सामना इंडी आघाडीचे उमेदवार तेजस्वी यादव आणि भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.

बिहारमध्ये मतदारानाच्या पहिल्या टप्प्यात पटना, दरभंगा, मधेपुरा, सहरसा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, लखीसराय, मुंगेर, शेखपूरा, नालंदा, बक्सर आणि भोजपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडेल. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडी या दोन्ही पक्षांच्या प्रमुख प्रचारकांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार मोहीम राबवली. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यावेळी प्रथमच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सामान्य निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिलाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना कोणत्याही हिंसक घटनेला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुरेशा संख्येने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत.

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी, 20 जिल्ह्यांतील 122 विधानसभा मतदारसंघांमध्ये पार पडणार आहे. मतमोजणी आगामी 14 नोव्हेंबरला होईल. संपूर्ण राज्यात 7 कोटी 43 लाखांहून अधिक मतदारांसाठी एकूण 90 हजार 712 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande