
छत्रपती संभाजीनगर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शेतकर्यांशी संवाद साधला.दगाबाज राज्य सरकारने घोषित केलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची वास्तविक माहिती शेतकर्याकडून घेत या कठीण काळात शेतकरी बांधवांच्या मी पाठीशी असल्याचा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.
मराठवाडयातील शेतकरी राजा भोळाभाबडा असून इतिहासात कधी नव्हे एवढ्या मोठ्या आपत्तीत पिचला गेला आहे.पॅकेजच्या नावाखाली सरकारने शेतकर्यांची क्रूर थट्टा लावली असल्याने शेतकरी म्हणुन सर्वानी एकत्र आले पाहिजे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,उपनेते विनोद घोसाळकर, सुभाष पाटील, ज्योतीताई ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, तालुकाप्रमुख मनोज पेरे,महिला आघाडी संपर्कसंघटक सुनीता जिल्हा संघटक राखी परदेशी व आशा दातार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis