यंदा उजनीत 6 टीएमसी पाणीसाठा कमी
सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सन 2025 च्या पावसाळी हंगामात उजनी धरणात ऑक्टोबर 25 अखेरपर्यंत 496.830 मीटर पाणी पातळी दिसते. जलाशयात 100 टक्के असा 117.23 टीएमसी एकूण पाणीसाठा व 53.57 टीएमसी जिवंत पाणीसाठा करण्यात आल्याचे दिसून येते. मात्र यावर्षी पा
यंदा उजनीत 6 टीएमसी पाणीसाठा कमी


सोलापूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। सन 2025 च्या पावसाळी हंगामात उजनी धरणात ऑक्टोबर 25 अखेरपर्यंत 496.830 मीटर पाणी पातळी दिसते. जलाशयात 100 टक्के असा 117.23 टीएमसी एकूण पाणीसाठा व 53.57 टीएमसी जिवंत पाणीसाठा करण्यात आल्याचे दिसून येते. मात्र यावर्षी पाणी साठवण क्षमता 11 टक्के कमी का केली, 6 टीएमसी पाणी कमी का साठवले, याचा परिणाम उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना भोगावा लागणार का, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

याप्रश्नी जलसंपदाचे अधिकारी मात्र टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.सन 2001 पासून सलग 24 वर्षे प्रत्येकवर्षी 15 ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारी पावसाळा गृहित धरुन उजनी धरणात 111.20 टक्के पाणी टक्केवारी व 123.23 टीएमसी एकूण पाणीसाठा केला जात होता व पाणी पातळी 497.730 मीटरपर्यंत ठेवलेली असते. परंतु 24 वर्षांत जे केले, ते यावर्षी केलेले नसून पाणी टक्केवारी 100 टक्के व एकूण पाणीसाठा 117 टीएमसी तर जिवंत पाणीसाठा 53 टीएमसीपर्यंत ठेवला आहे, म्हणजे यावर्षी 11 टक्के पाणी व सहा टीएमसी पाणीसाठा कमी केल्याचे दिसून येते आहे. या वस्तुस्थितीमुळे उजनीच्या कालव्यावरील एक आवर्तन कमी होणार, असे चित्र दिसत असून उन्हाळ्यामध्ये कालव्यातून पाणी मिळणार की नाही? याबद्दल आता शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे लाभक्षेत्रातील लाखो एकर बागायती पिके संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande