आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमला कोकणरत्न पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : आंतरराष्ट्रीय कॅरमपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथील आकांक्षा कदम हिला स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आकांक्षाचा कारकिर्दीतील हा सहावा पुरस्कार
आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमला कोकणरत्न पुरस्कार जाहीर


रत्नागिरी, 5 नोव्हेंबर, (हिं. स.) : आंतरराष्ट्रीय कॅरमपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथील आकांक्षा कदम हिला स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आकांक्षाचा कारकिर्दीतील हा सहावा पुरस्कार आहे.

आकांक्षाने कॅरममध्ये विसाव्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्यपदके मिळवली आहेत. सलग तीनवेळा ज्युनिअर राज्यस्तरीय गटाचे विजेतेपदक मिळवले आहे. राज्यस्तरावरील महिलांच्या एकेरी खुल्या गटाचे १३ वेळा विजेतेपद तिने पटकावले असून, एकवेळ तिने सलग तीनवेळा विजेतेपद मिळविले. आकांक्षाने अजूनपर्यंत विविध स्तरावर ३६ सुवर्णपदके, १३ रौप्य व १३ कास्यपदक अशी एकूण ६२ पदके मिळवली आहेत. त्यामधील ४ सुवर्णपदके व १ रौप्यपदके अशी एकूण ५ पदके आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत. राष्ट्रीय स्तरावर तिने ४ सुवर्णपदके व २ रौप्यपदके मिळवली आहेत. तिला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आकांक्षाचे खेळातील यश लक्षात घेऊन कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानाशेजारील पत्रकार भवनात वितरित केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande