अमरावती : 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र स्विकारण्यास सुरुवात
अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम - 2025 जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर
10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र स्विकारण्यास सुरुवात आयोगाच्या संदर्भानुसार  निवडणूक कार्यक्रम जाहीर


अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.)

अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, 2 नगरपंचायत अध्यक्ष आणि सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम - 2025 जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, वरुड, दर्यापूर, मोर्शी, शेंदूरजना घाट, चिखलदरा, चांदूर रेल्वे, चांदूर-बाजार आणि धामणगाव-रेल्वे या नगरपरिषद आणि धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या सूचनेनुसार नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता कालावधी हा 10/11/2025 ते 17/11/2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे.नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी हा 10/11/2025 ते 17/11/2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18/11/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून होणार असून याच दिवशी वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादीप्रसिद्ध करण्यात येणार आहे.ते नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसल्यास 19/11/2025 21/11/2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून तीन दिवसाच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande