
जळगाव, 6 नोव्हेंबर (हिं.स.) भामटयांनी मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास शिवशक्ती नगर रोड परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिवशक्ती नगरात राहणाऱ्या उषाबाई देविदास बोरसे या महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी विद्यालय येथे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्या रात्री ९ वाजता नेहमीप्रमाणे त्यांची नात कनिष्का हिच्यासोबत शिवशक्ती नगर रोडवर पायी फिरण्यासाठी गेल्या होत्या.
रात्री सव्वा वाजेच्या सुमारास त्या सुनील रत्नपारखे यांच्या घरासमोरून परत घरी जात असताना, त्यांच्या समोरून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. लगेच दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या २५ ते ३० वयोगटातील काळी टोपी घातलेल्या व्यक्तीने उषाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र व त्यामधील पदक बळजबरीने ओढून ते चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.उषाबाई यांनी आरडाओरड केली मात्र त्यांनी तेथून पोबारा केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर