
अकोला, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. कार्यालयातील लिपिक ममता पाटील यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलं. एका पोलीस कर्मचाऱ्याचे TA आणि DA बिल काढून देण्यासाठी त्यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली होती. फिर्यादी पोलीस शिपायाने थेट अमरावती एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. या कारवाईनंतर पोलिस विभागात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खाकी गणवेशावर पुन्हा एकदा डाग लागल्याने जिल्हाभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे