नेरळ येथे आठ जणांकडून कुटुंबावर हल्ला; गुन्हा दाखल
रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। नेरळ पाडा, राजबाग येथील बिल्डिंग क्र. १४ मध्ये दुखापतीचा गंभीर प्रकार घडला. या घटनेत 8 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण केल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. फिर्यादी अनुपमा अनंत कराळे (व
राजबाग, नेरळ येथे आठ जणांकडून कुटुंबावर हल्ला — नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। नेरळ पाडा, राजबाग येथील बिल्डिंग क्र. १४ मध्ये दुखापतीचा गंभीर प्रकार घडला. या घटनेत 8 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर हल्ला करून मारहाण केल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

फिर्यादी अनुपमा अनंत कराळे (वय ६२, रा. राजबाग, नेरळ पाडा) यांनी दिलेल्या दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा नातू अथर्व कराळे याचे आरोपी हार्दिक मसणे याच्यासोबत नेरळ रेल्वे स्टेशन बाहेर वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी हरिश्चंद्र भिवा मसणे, अविनाश शंकर तरे, शुभम तुकाराम तरे, हार्दिक मसणे, साई बाळाराम मसणे, निलेश तरे व दोन अन्य अज्ञात इसम यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कराळे कुटुंबीयांवर हल्ला केला.

आरोपींनी अथर्व कराळे यास बिल्डिंगखाली मारहाण केली व नंतर त्याला घरात ओढून नेऊन पुन्हा हाताबुक्याने मारहाण केली. या दरम्यान फिर्यादी अनुपमा कराळे, त्यांचे पती अनंत कराळे आणि सुन यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्र. १९६/२०२५ भा.दं.वि. कलम ३३३, १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पो.हवा. २३८४ वाघमारे करत असून गुन्ह्याचे कारण “दुखापत करणे” असे नमूद आहे.

जखमी अथर्व कराळे, अनुपमा कराळे व अनंत कराळे यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून आरोपींना बी.एन.एस.एस. २०२३ च्या कलम ३५(३) नुसार नोटीस देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande