लालपरी-शिवाई बससेवेमुळे 9 दिवसांत अमरावती विभागाची तब्बल 3 कोटी 21 लाखांची कमाई
अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीच्या उत्साहात यंदा ''लालपरी'' आणि ''शिवाई'' बसने अक्षरशः ''कॅश'' कमावली ! अमरावती विभागातून फक्त नऊ दिवसांत तब्बल 11 लाख 60 हजार किलोमीटर अंतर पार करत राज्य परिवहन महामंडळाने 3 कोटी 21 लाख 50 हजार रुप
'लालपरी' दिवाळीत लक्ष्मी रुपात पावली  9 दिवसांत अमरावती विभागाची तब्बल 3 कोटी 21 लाखांची कमाई


अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

दिवाळीच्या उत्साहात यंदा 'लालपरी' आणि 'शिवाई' बसने अक्षरशः 'कॅश' कमावली ! अमरावती विभागातून फक्त नऊ दिवसांत तब्बल 11 लाख 60 हजार किलोमीटर अंतर पार करत राज्य परिवहन महामंडळाने 3 कोटी 21 लाख 50 हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.दिवाळी काळात (18 ते 26 ऑक्टोबर) पुणे, नागपूर, अकोला, यवतमाळ, वर्धा आदी मार्गांवर तसेच जिल्ह्यांतर्गत जादा बसेस सोडण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांना अखंड सेवा उपलब्ध झाली. अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदुर बाजार, मोर्शी, वरूड आणि चांदुर रेल्वे या आठ आगारांमधून दिवसरात्र बससेवा धावत राहिली. सर्वाधिक अमरावती आगाराला (766.32 लाख) मिळाले, तर परतवाडा, बडनेरा आणि दर्यापूर आगारांनीही उल्लेखनीय कामगिरी के ली. महत्वाचे म्हणजे, महिलांच्या प्रवासात 40 टक्के वाढ झाली असून, 50 टक्के सवलतीमुळे महिला प्रवासी अधिक प्रमाणात एसटी सेवेकडे आकर्षित झाल्या.यंदा 8.88 टक्क्यांनी प्रतिकिलोमीटर उत्पन्नवाढ आणि गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्के अधिक कमाई नोंदवली गेली आहे. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नव्या लालपरी-शिवाई बससेवेमुळे यंदाची दिवाळी 'लक्ष्मी 'समान ठरली, असे अमरावती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande