
छत्रपती संभाजीनगर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थान वारकरी फड यांच्या वतीने आयोजित श्री एकनाथी भागवत जयंती महोत्सव २०२५ आणि श्री वै. श्रीगुरु नारायण महाराज पालखीवाले (नाथवंशज) पुण्यतिथी सोहळा अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
पैठण येथे श्री एकनाथी भागवत जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री एकनाथ भागवताच्या ४५२ व्या जयंतीनिमित्त श्री एकनाथी भागवत ग्रंथ पूजन सोहळा पार पडला. या पावन प्रसंगी वारकरी समुदाय, संत भक्त आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis