लातूर - दुचाकी व खडीने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू
लातूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। उदगीर तालुक्यातील मोर्तळवाडी (नळगीर) गावाजवळ दुचाकी व ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार चालकासह आणखी एक युवक जागीच ठार झाले आहेत. दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले होते.
लातूर - दुचाकी व खडीने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू


लातूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। उदगीर तालुक्यातील मोर्तळवाडी (नळगीर) गावाजवळ दुचाकी व ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार चालकासह आणखी एक युवक जागीच ठार झाले आहेत.

दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले होते. लातूरला पोहोचताच त्याचाही मृत्यू झाला.

उदगीर-जळकोट महामार्गावरील मोर्तळवाडी (नळगीर) गावाजवळ दुचाकी व खडीने भरलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. दुचाकीस्वार हे घोणसी येथून नळगीरकडे जात होता. मोर्तळवाडी गावाजवळ दुचाकीची (एम. एच. ५५-९०८९) व ट्रॅक्टरची धडक झाली. यात दुचाकी चालक गणेश दत्ता श्रीमंगले (वय २०, रा. नळगीर, ता. उदगीर) हा जागीच ठार झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेला निहाल मुसा कुरेशी (वय २०, रा. नळगीर ता. उदगीर) हा गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले. लातूर येथे पोहोचल्यानंतर त्याचाही मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande