
छत्रपती संभाजीनगर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’वंदे मातरम’ राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्षपुर्तीनिमित्त सार्थ शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, याची सुरुवात वक्तृत्व स्पर्धेने करण्यात आली.
महात्मा फुले सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत चार जिल्हयातील १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ.संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेचे स्पर्धेचे विषय - देशभक्तीची प्रेरणा-वंदे मातरम् , भारतीय संस्कृतीचा आत्मा-वंदे मातरम् , भारतीय स्वाभिमानाचे प्रतिक-वंदे मातरम् हे होते. या स्पर्धेत उद्धव दशरथे , पूजा नवल, साक्षी मुंडे , पूजा कदम यांनी पारितोषिक जिंकले..
स्पर्धेचे परीक्षक म्हणून महेश अंचितलवार, कवि निलेश चव्हाण, अनिकेत मस्के यांनी काम पाहिले. प्रा.जयश्री आहेर यांनी सूत्रसंचालन तर कवी धम्मपाल जाधव यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी हरिश्चंद्र साठे, गजानन पालकर यांनी परिश्रम घेतले.
भारताचे राष्ट्रीय गीत ’वंदे मातरम्’च्या लेखनास १५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ’वंदे मातरम् सार्धशताब्दी’ सोहळयाचे आयोजन करण्यात आले, कौशल्य, रोजगार उद्याजेकता व नाविण्यता मंत्री आणि राजभवन कार्यालयाद्वारे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ’वंदे मातरमची या राष्ट्रीय गीतास अद्वितीय स्थान प्राप्त झाले आहे. हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यानी रचलेल्याच्या घटनेला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ’वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव’ आयोजित करण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा, इतिहासाची जाणीव व सांस्कृतिक अभिमान वृध्दिगत करण्यासाठी विद्यापीठाद्वारे निबंध लेखन, वक्तृत्व चित्रकला व रिल्स निर्मिती स्पर्धांचे आयोजन केले आहे. यानिमित्त वंदे मातरम् सार्धशताब्दी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.
निबंध स्पर्धेचे विषय :- देशभक्तीची अमरज्योती-वंदे मातरम् , भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा-वंदे मातरम् , वंदे मातरम् - काल, आज आणि उद्या हे आहेत., वंदे मातरम् सार्धशताब्दी चित्रकला स्पर्धा ही घेण्यात आली, वंदे मातरम् सार्धशताब्दी रिल्स / र्शार्ट व्हिडिओ स्पर्धा होणार आहे. या सर्व स्पर्धाना ३ हजार, दोन हजार, एक हजार व पाचशे रुपये असे प्रत्येक कलाप्रकारात चार पारितोषिक देण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis