
मुंबई , 7 नोव्हेंबर (हिं.स.)।कतरीना कैफ आणि विकी कौशल आई- बाबा झाले आहेत. कतरिनाने ७ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला आहे.विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
विकीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की आमच्या लाडक्या बाळाचं आगमन झालं आहे. प्रेमाने आम्ही आमच्या बेबी बॉयचं स्वागत केलं आहे. विकीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर सेलिब्रिटींनीही विकी आणि कतरिनाचं अभिनंदन केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच विकी-कतरिनाने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता त्यांच्या आयुष्यात चिमुकल्याची दुडुदुडु धावणारी पावलं आली आहेत. विकी कौशल आणि कतरिनाने डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानमध्ये एका खासगी समारंभात विवाह केला होता. आता लग्नानंतर ४ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode