मायकेल जॅक्सनच्या बायोपिकचा टीझर प्रदर्शित
मुंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। जगभरातील संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. दिवंगत पॉप किंग मायकेल जॅक्सन आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ‘मायकेल’ चा पहिला अधिकृत टीझर रिलीज करण्यात आला असून, त्या
मायकेल जॅक्सनच्या बायोपिकचा टीझर प्रदर्शित


मुंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। जगभरातील संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. दिवंगत पॉप किंग मायकेल जॅक्सन आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ‘मायकेल’ चा पहिला अधिकृत टीझर रिलीज करण्यात आला असून, त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या चित्रपटात मायकेल जॅक्सन यांचा भाचा जाफर जॅक्सन आपल्या काकांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक आणि परफॉर्मन्स पाहून चाहत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आहेत.

टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या झलकांमध्ये मायकेलची प्रसिद्ध डान्स स्टाईल, फॅशन सेंस, आणि मंचावरील त्यांचा अद्वितीय चार्म पुन्हा अनुभवायला मिळतो. टीझरची सुरुवात क्विंसी जोन्स रेकॉर्डिंग स्टुडिओमधील एका दृश्याने होते, जिथे मायकेल आपल्या संगीतावर काम करताना दिसतो.

या बायोपिकचं दिग्दर्शन अँटॉनी फुक्वा यांनी केलं आहे, जे ‘ट्रेनिंग डे’ आणि ‘द इक्वलायझर’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. तर कथा जॉन लोगन यांनी लिहिली असून त्यांनी ‘ग्लॅडिएटर’ आणि ‘स्कायफॉल’ सारख्या हिट चित्रपटांचे लेखन केले आहे.

चित्रपटाचे निर्माते सांगतात की, ‘मायकेल’ ही फिल्म जॅक्सनच्या असामान्य आयुष्याची, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्याची आणि वैयक्तिक संघर्षांची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडेल.

फॅन्ससाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. असा विश्वास व्यक्त केला जातोय की ही बायोपिक मायकेल जॅक्सनच्या अमर संगीत वारशाला नव्या रूपात सजीव करेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande