साेलापुरात उमेदवार निवड प्रक्रियेचा भाजपने फोडला नारळ
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक जिल्हा व महापालिका क्षेत्रनिहाय निवडणूक प्रमुख व प्रभारींची नियुक्ती करत महायुतीतील घटक पक्षांना शह दिला आहे. त्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसा
bjp


सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक जिल्हा व महापालिका क्षेत्रनिहाय निवडणूक प्रमुख व प्रभारींची नियुक्ती करत महायुतीतील घटक पक्षांना शह दिला आहे. त्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रियेचा नारळ फोडत मित्रपक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एक नगरपंचायतीसाठी शुक्रवारपासून तीन दिवस इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रदेश भाजप ॲक्शन मोडवर आले आहे.निवडणूक प्रमुख, प्रभारींची घोषणा केल्यानंतर लागलीच गुरुवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील सर्व शासकीय जिल्ह्यांसह महापालिका क्षेत्राचे निवडणूक प्रमुख, प्रभारी, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष, सरचिटणीस यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह रवींद्र अनासपुरे, सुधीर देऊळगावकर यांनी निवडणूक तयारीसह उमेदवारी अर्ज भरण्यापासून निवडणूक निकालानंतर उमेदवारांचे खर्च सादर करण्यापर्यंतच्या तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande