पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणावर कामगार मंत्री अनभिज्ञ ?
अकोला, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कथित जमीन खरेदी व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.दोन दिवसांपासून या प्रकरणावर चर्चा सुरू असताना रा
पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणावर कामगार मंत्री अनभिज्ञ ?


अकोला, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कथित जमीन खरेदी व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.दोन दिवसांपासून या प्रकरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर मात्र संपूर्ण घडामोडीं पासून अनभिज्ञ असल्याचे सांगत चर्चेला वळसा घालताना दिसले.

निवडणुकीच्या तयारीत असल्याने या प्रकरणाची माहिती नाही असे सांगत फुंडकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. मात्र, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर सरकार कारवाई करणार असल्याचे आणि जर जमीन गैरमार्गाने बळकावली असेल तर ती परत घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले..राज्यातील एका उपमुख्यमंत्री यांच्या कुटुंबीयांच्या नावाचा संबंध लागलेल्या या गंभीर प्रकरणावर सरकारमधीलच मंत्र्यांना माहिती नसणे हा आश्चर्याचा विषय ठरत आहे. दोन दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या या व्यवहारावर सरकारची अशी 'माहिती नाही' भूमिका अनेक सवाल उपस्थित करत असून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट होईल का? दोषींवर ठोस कारवाई होईल का? की प्रकरण राजकीय दाबाखाली दडपले जाईल? — याकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande