कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल - सोलापूर आयुक्त
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)।महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या आदेशानुसार, शहरात रस्त्याच्याकडेला महिनोमहिने उभी असलेली बेवारस, गंजलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी,अस्वच्छता निर्माण करणारी वाहने व इतर साहित्य हट
Cp


सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)।महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या आदेशानुसार, शहरात रस्त्याच्याकडेला महिनोमहिने उभी असलेली बेवारस, गंजलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी,अस्वच्छता निर्माण करणारी वाहने व इतर साहित्य हटविण्याची मोहीम महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आली आहे.शहरातील रस्त्यांच्याकडेला आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहने यासंदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार खालीलप्रमाणे आकडेवारी नोंदविण्यात आली आहे.

चारचाकी वाहने : 102, दुचाकी वाहने : 37, तीनचाकी वाहने : 39, ट्रक : 5, डंपर : 1,इतर साहित्य : 303,एकूण: 487. या सर्व वाहनमालकांना व साहित्य धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.यासंदर्भात या आधीच वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची सुरुवात करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन रोडवरील ‘लावण्या रंग ट्रॅव्हल्स’ ही बेवारस बस उचलण्यात आली असून, हे वाहन वाहतूक पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. रस्ते मोकळे झाल्याने तेथील स्वच्छता करणे सुलभ होणार आहे. एकंदरच शहरवासीय तसेच शहरांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांमध्ये शहर स्वच्छ, सुंदर असल्याबाबत भावना निर्माण होणार आहे .या कारवाईमुळे अशा शासकीय जागेवर बेवारस अवस्थेत लावलेल्या वाहनांच्या खाजगी मालकांमध्ये जागृतीसह एक प्रकारची धास्ती निर्माण झालेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande