
चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) चंद्रपूरच्या वतीने ग्रामीण भागातील युवतींसाठी महिला शिवणकामाचे निवासी मोफत प्रशिक्षण 14 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण 31 दिवसांचे आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, लाछा, अनारकली ड्रेस, लहान मुलाचे ड्रेस, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज डिजाईन आणि शिलाई मशीनचे बेसिक आदी बाबी शिकविण्यात येतील.
यासोबतच बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणाबद्दलची माहिती, विविध कर्ज प्रकारांची माहिती देण्यात येईल. प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना बँक ऑफ इंडिया आर-सेटी कडून प्रमाणपत्र देण्यात येतील. प्रशिक्षण घेणाऱ्यांचे वय 18 ते 45 असावे. तसेच या प्रशिक्षणामध्ये व्यवसायातील अनुभवी व्यक्तींना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल.
सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी वेळ 11 ते 1 वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर रोड, जुने डीएड कॉलेज जवळ, बाबूपेठ, चंद्रपूर येथील अनुप कासवटे (मो.नं 8421009602) आणि अक्षय लांजेकर (मो.नं 9021913751) यांच्याशी संपर्क करावा. तसेच आपली नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. हे प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशीसाठी आहे, असे आर-सेटी कार्यालयाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव