चंद्रपूर - आधारभुत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीनची खरेदी 15 नोव्हेंबरपासून
चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम २2025-26 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी 30 ऑक्टोबर पासून सुरू
चंद्रपूर - आधारभुत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीनची खरेदी 15 नोव्हेंबरपासून


चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम २2025-26 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी 30 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2025 पासुन सुरू करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाने मुग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता आधारभुत दर निश्चित केले आहेत. मुंग – 8768 रुपये प्रति क्विंटल, उडीद – 7800 रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीन 5328 रुपये प्रति क्विंटल.

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही केंद्रीय नोडल एजेन्सीना खरेदीकरीता जिल्ह्यांची विभागणी करून दिली आहे. यात नाफेडच्या वतीने अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापुर, लातुर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम, छ. संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यात खरेदी सुरू करण्यात येईल. तर राज्य सहकारी पणन महासंघ (एन.सी.सी.एफ) च्या वतीने नाशिक, अ. नगर, सोलापुर, हिंगोली, चंद्रपुर व नागपुर या जिल्ह्यांमध्ये खरेदी सुरू होणार आहे.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार मुग, उडीद य सोयाबीन खरेदी योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुंग, उडीद व सोयाबीन विक्रीकरीता आपल्या गावाजवळील नाफेड/एनसीसीएफ च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावे. सदर नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पॉस मशिनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, चालु वर्षाचा 7/12 उतारा, पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

तसेच खरेदीकरीता आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील व संचालक मंडळ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande