चंद्रपूर - सोमवारी नागपूर शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर ह्या नागपूर येथे रुजू झाल्‍यापासून नागपूर विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शेकडो समस्‍या प्रलंबित असल्‍याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्‍याने विदर्भ माध्यमिक श
चंद्रपूर - सोमवारी नागपूर शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर ह्या नागपूर येथे रुजू झाल्‍यापासून नागपूर विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शेकडो समस्‍या प्रलंबित असल्‍याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्‍याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या कार्यालयासमोर दुपारी ३ वाजेपासून समस्‍या सुटेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्यासोबत दि. ७ ऑक्‍टोंबर २०२५ रोजी जि. प. सभागृह, नागपूर येथे पार पडलेल्‍या समस्‍या निवारण सभेत दिलेल्‍या आश्‍वासनानुसार नागपूर विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाही. सभेचे इतिवृत्त अद्याप दिलेले नाही. नागपूर विभागातील जवळपास मार्च महिन्यापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रुजू झालेल्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती झालेल्‍या, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या व अल्पसंख्याक दर्जा प्राप्‍त शाळा/महाविद्यालयांमध्ये नियुक्त शिक्षक - कर्मचाऱ्यांची शालार्थ आयडी प्रकरणे प्रलंबित आहेत. पोस्ट अटॅच - डिटॅचची कार्यवाही सुद्धा प्रलंबित आहेत. मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. भंडारा व अधीक्षक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी (माध्य.) भंडारा यांच्या नियमबाह्य व अनियमितता प्रकरणांबाबत केलेल्‍या तक्रारीनुसार चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, अजूनही चौकशी समितीने चौकशी केलेली नाही. यासह विविध मागण्यांना घेऊन विमाशि संघाच्या वतीने सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या कार्यालयासमोर दुपारी ३ वाजेपासून समस्‍या सुटेपर्यंत ठिय्या - धरणे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) पूणे, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई, आयुक्‍त (शिक्षण) पुणे यांना दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande