सोलापूर - डी.वाय.एफ.आयचे 11 वे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय) चे 11वे जिल्हा अधिवेशन कॉ. गोदूताई परुळेकर नगर, मौजे कुंभारी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या अधिवेशनात विक्रम कलबुर्गी यांची जिल्हाध्यक्षपदी, ॲड. अनिल वासम
सोलापूर - डी.वाय.एफ.आयचे 11 वे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न


सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय) चे 11वे जिल्हा अधिवेशन कॉ. गोदूताई परुळेकर नगर, मौजे कुंभारी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या अधिवेशनात विक्रम कलबुर्गी यांची जिल्हाध्यक्षपदी, ॲड. अनिल वासम यांची जिल्हा सचिवपदी, तर बाळकृष्ण मल्याळ यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

अधिवेशनाची सुरुवात संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अशोक बल्ला यांच्या हस्ते झेंडावंदनाने झाली. त्यानंतर क्रांती चौक ते अधिवेशन स्थळापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. तरुणांनी पांढऱ्या शुभ्र झेंड्यांसह “इंकलाब जिंदाबाद”, “नई सदी की नई लडाई – करो पढ़ाई, लड़ो लड़ाई”, “सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार मिळालेच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.

अधिवेशनाचे उद्घाटन कामगार नेते कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या हस्ते झाले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, “आज युवकांच्या नोकरीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. उच्च शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही, त्यामुळे युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे. या परिस्थितीला जबाबदार धोरणांविरोधात युवकांनी संघटितपणे संघर्ष करावा.”

या अधिवेशनाला सीटूचे कॉ. किशोर मेहता, जनवादी महिला संघटनेच्या कॉ. नसीमा शेख, एस.एफ.आय. चे कॉ. मल्लेशम कारमपुरी, किसान सभेचे कॉ. सुभाष बावकर, तसेच गोदूताई परुळेकर सहकारी गृहनिर्माण संस्था व रे-नगर फेडरेशन तर्फे विल्यम ससाणे आणि नलिनीताई कलबुर्गी यांनी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande