सोलापुरात मतदानासाठी मध्य प्रदेशातून आल्या ‘ईव्हीएम’
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कधीही प्रक्रिया सुरू, होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व जिल्हा परिषदांच्य
evm


सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी कधीही प्रक्रिया सुरू, होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील ईव्हीएम वापरल्या जाणार आहेत. मध्य प्रदेशातील ईव्हीएम आज सोलापुरात दाखल झाल्या असून या मशिन रामवाडी गोदामात उतरवून घेण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेशातून सोलापूरसाठी ३ हजार ३६६ कंट्रोल युनिट व ७ हजार ५०० बॅलेट युनिट आणले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात २ हजार ८५० मतदान केंद्र असणार आहेत. या साठी ३ हजार १६८ कंट्रोल युनिटची तर ६ हजार २७६ बॅलेट युनिटची आवश्‍यकता आहे. मध्य प्रदेशातून आलेल्या ईव्हीएम सुरुवातीला नगरपरिषद/नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. बार्शी, अक्कलकोट, करमाळा, दुधनी, मंगळवेढा, सांगोला, मैंदर्गी, पंढरपूर, मोहोळ, अकलूज, कुर्डूवाडी या ११ नगरपरिषदा व नगरपंचायतीची निवडणूक अगोदर होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande