परभणी - झिरोफाटा येथून रुग्णांसाठी मोफत बस सेवा सुरु
परभणी, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या वतीने पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेचा शुभारंभ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते
झिरोफाटा येथून  रुग्णांसाठी मोफत बस सेवा सुरु


परभणी, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या वतीने पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेचा शुभारंभ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवानंद अमृत भारती महाराज,संतोष मासोरे, शिवाजीराव काळे, गजानन शिवाजी काळे, ओम नारायणराव काळे,व्यंकटेश काळे,दत्तात्रय काळे,माणिक भालेराव,लक्ष्मण तात्या भालेराव,अविनाश भालेराव,हनुमान भालेराव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले, झिरोफाटा बस स्थानक ते आर.पी. हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत आर.पी. हॉस्पिटल येथे जाण्यासाठी दोन बसची व्यवस्था करण्यात आली आहे.या सेवेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी प्रवास सुलभ होणार आहे.असे डॉ.पाटील म्हणाले.

मोफत बस सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे सोयीचे होईल आणि त्यांचा उपचाराचा प्रवास सुखकर होईल. तसेच, मोफत तपासणी आणि परवडणाऱ्या दरातील वैद्यकीय सुविधांमुळे प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार मिळतील. असे याप्रसंगी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande