रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सर्व कार्यालये, स्थानकात वंदे मातरम् राष्ट्रगीताचे समूहगायन
रत्नागिरी, 7 नोव्हेंबर, (हिं. स.) : वंदे मातरम् या गीताला आज दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व स्थानकांत आणि कार्यालयांमध्ये वंदे मातरम् राष्ट्रगीताचे समूहगायन करण्यात आले. थोर दिवंगत कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चटोप
कोकण रेल्वेत वंदे मातरम् राष्ट्रगीताचे समूहगायन


रत्नागिरी, 7 नोव्हेंबर, (हिं. स.) : वंदे मातरम् या गीताला आज दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व स्थानकांत आणि कार्यालयांमध्ये वंदे मातरम् राष्ट्रगीताचे समूहगायन करण्यात आले.

थोर दिवंगत कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम् गाण्याला आज दीडशे वर्षे पूर्ण झाली. हे गीत प्रथम त्यांनी लिहिलेल्या आनंदमठ नामक त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचा भाग होते. नंतर हे गाणे राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले. या गाण्याचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आज ७ नोव्हेंबर २०२५ पासून एक वर्षभर साजरा होणार आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांत आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयासह सर्वच स्थानकांत रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या गाण्याचे समूहगान केले.रत्नागिरी विभागात विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्वच स्थानकांत वंदे मातरम् चे समूहगान करण्यात आले. यावेळी स्थानकांमध्ये उपस्थित असलेले प्रवासीही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande