कात्रज घाटातील सुरक्षा ऐरणीवर; सीसीटीव्हीसह पथदिव्यांचा अभाव
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। कात्रज घाट परिसर हा सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि वनविभाग अशा तीन खात्यांच्या अखत्यारित येतो. त्यांच्यातील हद्दीच्या वादामुळे आणि काम नेमके कोणी करायचे, अशा प्रश्नांमुळे आवश्यक ठिकाणी पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे
कात्रज घाटातील सुरक्षा ऐरणीवर; सीसीटीव्हीसह पथदिव्यांचा अभाव


पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। कात्रज घाट परिसर हा सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि वनविभाग अशा तीन खात्यांच्या अखत्यारित येतो. त्यांच्यातील हद्दीच्या वादामुळे आणि काम नेमके कोणी करायचे, अशा प्रश्नांमुळे आवश्यक ठिकाणी पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्याने वाहनचालक, प्रवाशांसाठी हा घाट अद्याप असुरक्षितच आहे.पुण्याहून सातारामार्गे कोल्हापूर, सांगली, बंगळूरकडे जाणाऱ्या किंवा घाट ओलांडून खेड-शिवापूर, शिरवळकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी कात्रज घाट सोयीचा ठरतो. मात्र, रात्रीच्या वेळी हा घाट निर्जन आणि धोकादायक बनतो. परिसरात मध्यरात्री तरुण-तरुणींचा मुक्त वावर असतो. भारती विद्यापीठ पोलिसांनी घाटात मध्यरात्री फिरण्यास आलेल्या अनेकांना समज दिल्याचेही सांगण्यात येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande