खा.बळवंत वानखडे, आ.गजानन लवटेकडून आचारसंहितेचे उल्लंघन 
दर्यापूर पंचायत समितीच्या इमारतीचे केले भूमिपूजनअमरावती, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दर्यापूर पंचायत समितीच्या इमारतीचे श्रेय घेण्याचा प
खा.बळवंत वानखडे, आ.गजानन लवटेकडून आचारसंहितेचे उल्लंघन  दर्यापूर पंचायत समितीच्या इमारतीचे केले भूमिपूजन


दर्यापूर पंचायत समितीच्या इमारतीचे केले भूमिपूजनअमरावती, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या दर्यापूर पंचायत समितीच्या इमारतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर दर्यापूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामाची भूमिपूजन केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात भाजपच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन आदर्श आचारसंहिता लागू केली.अमरावती जिल्ह्यातही नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू केल्यानंतर खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी दर्यापूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामाची भूमिपूजन केले. भूमिपूजनाचे बोर्ड उभारने, शासकीय जागेचा व साधनांचा वापर करणे, लोकप्रतिनिधींची जाहीर उपस्थिती दर्शवणे ही सर्व कृती आदर्श आचारसंहिता नियम 7, 10, 16 चे उल्लंघन करणारी आहे. संदर्भातील तक्रार भाजपच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे. त्यामुळे संबंधितांवर आदर्शा आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

याबाबत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करून गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी पंचायत समितीची नूतन इमारत मंजूर करून घेतली. असं असतानाही परस्पर कामाचं श्रेय घेण्यासाठी आचार सहिता लागल्यावर भूमिपूजन करणे हे नियमबाह्य आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande