सोलापूर - लाडक्या बहिणींमध्ये जि.प. महिला कर्मचारी
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 150 पेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. त्याची यादी महिला व बालकल्याण विभागाने प्रशासन विभागाला पाठविली आहे. त्यानुसार प्रशासन विभागाकडून या
सोलापूर - लाडक्या बहिणींमध्ये जि.प. महिला कर्मचारी


सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील 150 पेक्षा जास्त महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. त्याची यादी महिला व बालकल्याण विभागाने प्रशासन विभागाला पाठविली आहे. त्यानुसार प्रशासन विभागाकडून यादीतील महिलांची पडताळणी होणार आहे.जिल्ह्यात 10 लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्याची यादी शासनाने महिला व बालकल्याण विभागाला पाठविली आहे. त्या विभागाने प्रशासन विभागास यादी पाठवून या कर्मचाऱ्यांची शहानिशा करुन माहिती पाठवावी, अशी विनंती केली आहे

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांची यादी द्यावी. तसेच कोणत्या विभागाच्या किती महिलांचा समावेश आहे, अशी विचारणा प्रशासन विभागाकडे केल्यानंतर त्या महिलांची यादी विभागाकडे आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधल्यानंतर प्रशासन विभागाला यादी पाठविली असून, लवकरच प्रशासन विभाग प्रमुखाकडे यादी जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यादी आल्यानंतर कोणत्या विभागातील, किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, याची माहिती मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande