
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। 'वंदे मातरम्' गीतास आज १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या उपस्थित 'वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी महेश सुधाळकर, डॉ. चारुशिला देशमुख, सुरेखा माने, रामहरी भोसले, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उमाकांत कडनोर, सुनंदा भोसले, नायब तहसीलदार अपर्णा भोसले, सुयोग बेंद्रे, यांच्या कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु असलेला मुख्य कार्यक्रम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय, पुणे, व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच वंदेमातरमला समर्पित विशेष सभा, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर तयार करणे आदी उपक्रम राबविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु