अण्णा बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्रीपदी नियुक्ती
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हा आढावा बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील वरळी
ेकिह


सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हा आढावा बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईतील वरळी येथे नुकत्याच पार पडलेल्या या आढावा बैठकीदरम्यान सोलापूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या सामाजिक समीकरणांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी, विद्यमान संपर्कमंत्री कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या जोडीला सहसंपर्कमंत्री म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ दखल घेत, सामाजिक समतोल लक्षात घेऊन अण्णा बनसोडे यांच्या नियुक्तीस मान्यता दिली.या निर्णयाचे स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंददादा चंदनशिवे, तसेच ज्येष्ठ नेते तोफिक शेख यांनी केले.आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या बरोबरच अण्णा बनसोडे हे सोलापूरच्या निवडणूक नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करून निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यात येणार आहे.या दोन नेत्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुका जोमाने लढविण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande