पिंपरी चिंचवड महापालिकेची  प्रारूप मतदार यादी  १४ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महाप
PCMC


पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ असणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून ६ डिसेंबर २०२५ प्रसिद्ध करण्यात येईल. तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबर २०२५ प्रसिद्ध करण्यात येणार असून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande