
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। महापालिकेने यावर्षी मार्चपासून नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रांच्या आरक्षणासाठी ‘रंगयात्रा’ हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. मात्र त्यावेळी संपूर्णतः ऑनलाइन आरक्षणाला नाट्य व्यवस्थापक, संयोजक आणि निर्मात्यांनी विरोध केला होता. त्यामुळे पुढील दोन चौमाहींच्या आरक्षणासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन (प्रत्यक्ष) अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र आता संपूर्ण आरक्षण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.या प्रयत्नाला पुन्हा एकदा नाट्य व्यवस्थापक आणि संयोजकांनी विरोध केला आहे. त्यांनी ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेत आक्षेप नोंदवले.
या बैठकीला महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे, नाट्यगृहांचे प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांच्यासह मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, शिरीष कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, समीर हंपी, सत्यजित धांडेकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु