
रत्नागिरी, 7 नोव्हेंबर, (हिं. स.) : निवडणूक होणार असलेल्या नगरपालिका क्षेत्रात सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपक लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
रिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार करतात. तसा तो केल्यास ध्वनिप्रदूषण, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची शक्यता असते. रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपक वापरावर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आचारसंहिता कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध घातले आहेत.
ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी