
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वरळी डोम (एनएससीआय) येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत साठे यांचा लवकरच प्रवेश होणार आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील आढावा आज उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष, खा. सुनील तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह जिल्ह्यातून माजी आमदार संजयमामा शिंदे, कल्याणराव काळे, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, तौफिक शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड